

Kalyan 6 Month Baby Kidnapping
ESakal
डोंबिवली: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर उड्डाणपुलाखाली झोपलेल्या एका महिलेच्या सहा महिन्यांच्या बाळाचे अनोळखी व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. अपहरणकर्त्याने बाळाला घेऊन जाताना महिलेचा मोबाईल फोनही चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी अपहरण व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.