esakal | उद्यापासून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु; व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

kalyan apmc

बाजार आवार सुरु करतानाच बाजार आवारात गर्दी होऊ नये यासाठी भाजीपाला, फळे व कांदा बटाटा बाजार विभागातील इमारत व गाळा व्यापाऱ्यांना दिवस ठरवून देण्यात आला असून केवळ घाऊक व्यापारास परवानगी देण्यात आली आहे.

उद्यापासून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु; व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार आवारही बंद होते. महापालिका क्षेत्रातील  हॉटस्पॉट वगळता इतर भागातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने मंगळवारपासून (ता. 21) निर्बंधानुसार बाजार समिती सुरु करण्याचा निर्णय सोमवारी(ता. 20) घेण्यात आला. 

कांदिवली येथे रेल्वेची ट्रकला धडक; सुदैवाने मोठा अपघात टळला...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 19 जुलैपर्यंत पूर्ण लॉकडाऊन घेण्यात आला होता. यामुळे बाजार समितीचे बाजार आवारही बंद ठेवण्यात आले होते. सोमवारपासून महापालिकेने हॉटस्पॉट वगळता इतर भागातील लॉकडाऊन शिथील केली असल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार आवारही खुला करावा याविषयी सोमवारी आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. बाजार समितीतील मुख्य अन्नधान्य बाजार विभाग 16 जुलैपासूनच सुरु करण्यात आला होता. परंतु बाजार विभाग लॉकडाऊनमुळे सुरु करण्यात आला नव्हता. 

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, ट्विटरवरुन दिली माहिती

आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने हा विभागही मंगळवार पासून सुरु होत आहे. बाजार आवार सुरु करतानाच बाजार आवारात गर्दी होऊ नये यासाठी भाजीपाला, फळे व कांदा बटाटा बाजार विभागातील इमारत व गाळा व्यापाऱ्यांना दिवस ठरवून देण्यात आला असून केवळ घाऊक व्यापारास परवानगी देण्यात आली आहे. अन्नधान्य व्यावसायिकांनी ऑनलाईनच व्यवसाय करावा असे सांगण्यात आले आहे. अटी शर्थींसह कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजार आवार मंगळवार पासून खुला करण्यात येईल. अटी-शर्थींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी निर्देश काढले आहेत. 

मातोश्रीवर कोरोनाची पुन्हा धडक! तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन...

असे असतील नियम 

  • बाजार आवारात किरकोळ व्यापार पूर्णतः बंद राहील.
  • दर रविवारी निर्जंतुकीकरणासाठी बाजार आवार संपूर्ण बंद राहील. 
  • बाजाराची वेळ पहाटे 5 ते सायंकाळी 5 अशी राहील. 
  • माल घेऊन येणाऱ्या वाहनांना पहाटे 5 पासून प्रवेश देण्यात येईल आणि रिकाम्या वाहनांना जाण्यासाठी सकाळी 6 पासून प्रवेश दिला जाईल. 
  • मालवाहतूक करणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त कोणत्याही खासगी वाहनांना बाजार आवारात प्रवेश नाही. 
  • दुकानाच्या बाहेर सॅनिटायझरची व्यवस्था, सायंकाळी दुकान बंद करतेवेळी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. 
  • इमारतीच्या पॅसेजमध्ये किंवा रस्त्यावर व्यवसाय करु नये. 
  • ग्राहकांनी, दुकानातील विक्रेत्यांनी मास्क वापरणे बंधनकारक.

---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top