कल्याणकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; वाचा सविस्तर माहिती

Traffic jam
Traffic jamsakal media

कल्याण : कल्याण-डोंबिवली (kalyan-dombivali) शहरात रेल्वे (railway), महापालिका (municipal corporation), रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीएच्या (MMRDA) माध्यमातून रस्ते, तलाव व उद्यानांची विविध कामे सुरू असून २०२२ मध्ये यातील बहुतांश कामे पूर्ण (work about to complete) होणार आहेत. त्यामुळे वाहतूक, अस्वच्छतेच्या समस्यांनी ग्रस्त कल्याण-डोंबिवलीकरांना (get rid of traffic) काहीसा दिलासा मिळणार आहे. (kalyan-dombivali people get rid of from traffic problems in the city whereas works about to complete)

Traffic jam
महाराष्ट्र : आखाती देशांमध्ये व्यवसाय वाढणार; महाबीज परिषदेचा दुबई दौरा

भिवंडी-कल्याण-शिळफाटा रोडवरील पत्रिपुलाच्या तिसऱ्या दोन पदरी पुलाचे काम रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. नवीन वर्षाच्या अखेरीस वाहतुकीसाठी हा पूल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कल्याण-शिळ रस्त्यावरील मोठी वाहतूक कोंडी दूर होणार आहे.
कल्याण-भिवंडी रोडवरील खाडीवरून जाणाऱ्या दुर्गाडी पुलाजवळ वाढणारी वाहतूक कोंडी पाहता नवीन सहापदरी दुर्गाडी पुलाच्या कामाचे २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.

हे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असून पुलासाठी आतापर्यंत ७३ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. अनेक तांत्रिक अडचणींमुळे खाडीमधून जाणाऱ्या या सहापदरी पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोडींचा त्रास अजूनही सहन करावा लागत आहे. आतापर्यंत या पुलाच्या दोन लेनचे काम पूर्ण झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आले आहे. उर्वरित चार लेनचे कामही पूर्ण झाल्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांचेही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास येथील मोठी वाहतूक कोंडी दूर होणार असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

Traffic jam
दहिसर SBI बँक दरोडा: बुटामुळे दरोडेखोर अटकेत, श्वानानं काढला माग

सिग्नल यंत्रणा स्मार्ट होणार

वाहतूक कोंडी आणि वाहन चालकांना वचक बसविण्यासाठी शहरात स्मार्ट सिटी विभागामार्फत सिग्नल यंत्रणा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्या माध्यमातून नवीन वर्षात वाहतूक पोलिस नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करणार आहेत.

काळा तलावाचे सुशोभीकरण

स्मार्ट सिटी अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात काळा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. नवीन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. तसेच, स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याणच्या गौरी पाडा परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून सिटी पार्क उभे करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन वर्षात कल्याणकरांना मोठी भेट मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com