Murder
MurderMurder

धक्कादायक : आई, मुलगा गंभीर जखमी...तर बाजूलाच पित्याचा मृतदेह

कल्याण पश्चिमेत घडली धक्कादायक घटना

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील निखिल हाईट्स या सोसायटीमध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीत राहणाऱ्या लोकेशने वॉचमनाला रुग्णवाहिका बोलावण्यास सांगितले. मात्र वॉचमनला शंका आल्याने त्याने सोसायटीतील इतर सदस्यांसोबत घरात जाऊन पहाणी केली असता ही घटना उघडकीस आली. घरात लोकेश याचे वडील प्रमोद बनोरीया हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

तर लोकेश व त्याची आई कुसुम हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करीत घटनेची नोंद केली आहे.

Murder
इसापुर धरणातून जाणारे पाणी ३० डिसेंबरला रोखणार; सिंचन समितीचा निर्णय

कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील निखिल हाईट्स सोसायटीमध्ये सेवानिवृत्त प्रमोद बनोरीया (वय 55) कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरात घडलेल्या या प्रकाराची माहिती सोसायटीच्या रहिवाशांनी महात्मा फुले चौक पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात एक तरुण व एक महिला जखमी अवस्थेत तसेच एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घरात सर्वत्र रक्त सांडलेले दिसून आले. ही घटना रात्री घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

वडिलांनी आम्हाला जखमी केलं त्यांनंतर स्वतःला संपविले अशी माहिती मुलगा लोकेश याने पोलिसांना सांगितली आहे.

Murder
Pune Crime: पोलीस आल्याचे पाहताच चोरट्यांनी काढला पळ

लोकेशन सोसायटीच्या वॉचमनला रुग्णवाहिका हवी म्हणून फोन केला होता. मात्र वॉचमनला शंका आल्याने त्यांनी सोसायटीच्या इतर सदस्यांना सांगितलं. सदस्यांनी घरी जाऊन पाहिलं असता त्यांना धक्का बसला त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील घटना स्थळी दाखल झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जखमी माय लेकावर रुग्णालयात उपचार सूरु आहेत. त्यांची चौकशी करण्यात येईल. त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com