

Fake RPF Officer News
ESakal
कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरूण लग्नासाठी बनावट RPF अधिकारी बनला होता. आरपीएफ अधिकाऱ्याचा गणवेश घालून रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या या तोतया आरपीएफ अधिकाऱ्याला अखेर कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश जाधव (रा. भूम, जि. धाराशिव) असे या तरुणाचे नाव असून पोलीस बनण्याची क्रेझ आणि लग्न जमवण्यासाठी केलेले कृत्य त्याला भलतेच महागात पडले आहे.