

Political heat intensifies in Kalyan as BJP initiates strategic action following the Dombivli ‘surgical strike’, creating ripples in both Shinde Sena and Thackeray camps.
sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: डोंबिवली मधील शिंदे सेनेतील वजनदार पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश करत भाजपाने सेनेला मोठा धक्का दिला. डोंबिवलीत झालेल्या राजकीय हालचालींचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ ताजे असतानाच, आता कल्याणमध्येही भाजपचे ऑपरेशन लोटस सक्रिय झाल्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहेत. कल्याण पूर्व व पश्चिमेतील काही मोक्याचे पदाधिकारी भाजपाने गळाला लावले असून येत्या शनिवारी रविवारी हा धक्का शिंदे व ठाकरे गटाला मिळणार आहे.