

पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असतनाच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. तर केडीएमसीच्या डॉक्टरांनी हे आरोप फेटाळत 'आम्ही कोणताही हलगर्जीपणा केला नाही, शवविच्छेदन अहवाल आल्यावरच मृत्यचे कारण स्पष्ट होईल' असे सांगितले.