Mumbai News: बोरिवलीच्या धर्तीवर कांदिवली रेल्वे स्थानकाचा विकास, गाड्यांची क्षमता वाढणार

Mumbai Railway Station Development: बोरिवलीच्या धर्तीवर कांदिवली रेल्वे स्थानकाचा विकास केला जाणार आहे. स्थानकातील गर्दी कमी करणे, लांब पल्ल्याच्या गाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Kandivali Railway Station Development

Kandivali Railway Station Development

ESakal

Updated on

मुंबई : पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील बोरिवली स्थानकावरचा भार दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कांदिवली रेल्वे स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. बोरिवली स्थानकातील गर्दी कमी करणे, लांब पल्ल्याच्या गाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी कांदिवली स्थानकाचा विकास केला जाणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १५) यासंदर्भात झालेल्या बैठकीस राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू तसेच रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com