बेबी डॉल कनिकाच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली "ही" माहिती, वाचा बातमी

बेबी डॉल कनिकाच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली "ही" माहिती, वाचा बातमी

मुंबई : लंडनहून भारतात आलेली गायिका कनिका कपूर हिची 20 मार्चला केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर केलेल्या तिच्या केलेल्या चाचण्याही पॉझिटीव्ह आल्या. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाली. आता कनिकाची प्रकृती स्थिर असल्याचा खुलासा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कनिका 9 मार्चला लंडनहून परतली, तेव्हा विमानतळावर कोरोनाबाबत तपासणी होत नव्हती. लखनऊला काही दिवस थांबल्यानंतर ती कानपूरला जाऊन कुटुंबीयांना भेटली. त्यानंतर एका पार्टीला हजेरी लावून ती एका मित्राला भेटण्यासाठी पुन्हा लखनऊला गेली. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची कल्पना तिला या काळात नव्हती. लखनऊला घरी परतल्यानंतर तिला त्रास जाणवू लागला. डॉक्‍टरांना माहिती दिल्यावर 19 मार्चला तिची कोरोना चाचणी करण्यात आली आणि 20 मार्चला अहवाल पॉझिटिव्ह आला, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. 

"डॉक्‍टरांशी गैरवर्तन नाही' 
कनिकाने रुग्णालयातील डॉक्‍टरांशी गैरवर्तन केले नव्हते, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कोरोना झाल्याचे समजल्यावर कनिकाला लखनऊतील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला रुग्णालयातील कपडे घालण्यास सांगण्यात आले. कपडे बदलण्यासाठी खोली न देता तिला एका पडद्याआड जाण्यास सांगितले. तिथे अस्वच्छता असल्याने साफसफाई करण्याची सूचना तिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना केली. त्यावरून कनिकाने डॉक्‍टरांशी गैरवर्तन केल्याची चर्चा सुरू झाल्या. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नव्हते, असा दावा तिच्या आईवडिलांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com