esakal | कांजूरमार्ग जंबो केंद्र पालिकेकडे होणार सुपूर्द
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कांजूरमार्ग जंबो केंद्र पालिकेकडे होणार सुपूर्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चाचणी पॉझिटिव्हीटी (Positive) दर आणि सक्रिय रुग्णांमध्ये दररोज झालेल्या वाढीमुळे अधिकार्‍यांमध्ये चिंता वाढली असून ही संख्या आणखी वाढेल या भीतीने जास्तीत जास्त बेड्सची (Bed's) क्षमता वाढवण्याच्या पालिका प्रयत्नात आहे.

मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या सद्यपरिस्थितीच्या आढाव्यानंतर कोविड केअर सुविधा आणि कोविड समर्पित रुग्णालयांची सुविधा वाढवण्यावर भर दिली आहे. पुढील महिन्यापर्यंत कांजूरमार्ग जंबो केंद्र पालिकेकडे सुपूर्द होण्याची आशा असून गरज पडल्यास 30 हजार बेड्स तात्काळ सक्रिय केले जातील. तर, पुढच्या महिन्यापर्यंत कांजूर मार्ग जंबो केंद्र पालिकेकडे सुपूर्द होऊ शकेल असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, कोविड केअर सेंटर (सीसीसी) च्या बेडची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. ई आणि एच पश्चिम वॉर्डमध्ये बफरींग बेड जोडणे आवश्यक आहे, कारण या वॉर्डमध्ये 60 टक्क्यांहून अधिक सक्रिय बेड भरलेले आहेत. 13 ऑगस्ट या दिवशी 2,900 सक्रिय रुग्णांवरुन मंगळवारी हा आकडा 4,600 वर पोहोचला आहे.

हेही वाचा: "कोविड-१९ बिमारी और इलाज" या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

काही वॉर्ड्समध्ये कमी बेड -

पालिकेच्या कोविड डॅशबोर्डनुसार, अनेक लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना पालिकेच्या विविध संस्थात्मक क्वारंटाईन केंद्रांमध्ये दाखल केले जाते.

मुंबईत 22,000 पेक्षा जास्त बेड रिक्त असताना, ई प्रभागात उपलब्ध बेडपैकी 55 टक्क्यांपेक्षा जास्त बेड भरलेले आहेत. प्रभागातील 508 सक्रिय बेडपैकी 270 बेड्स भरलेले आहेत. त्याचप्रमाणे, एच पश्चिम प्रभागात एकूण 387 खाटांपैकी फक्त 11 टक्के जागा रिक्त आहेत. आर दक्षिण प्रभागातही 390 सक्रिय बेड्सपैकी 49 टक्के भरलेले आहेत. तर, आर सेंट्रल वॉर्डमध्ये, एकूण 250 सक्रिय बेडपैकी 52 टक्के बेड्स भरलेले आहे.

वेट अँड वॉचची भूमिका -

पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “ आणखी बेड वाढवण्याची गरज नाही कारण एकूण सुविधांपैकी फक्त 10 टक्के जागा भरलेली आहे, परंतु, जर विशिष्ट वॉर्ड्समध्ये लक्ष देणे आवश्यक असेल तर त्यानुसार निर्णय घेऊ. लवकरच कांजूरमार्ग जंबो केंद्राचा कोविड सुविधांच्या यादीत समावेश होईल. सद्यस्थितीत पालिका जरी पूर्ण तयारीत असली तरी मुंबईत रुग्णसंख्या वाढण्याची गती नियंत्रणात आहे. शिवाय, बरेच लोक शहराबाहेर आहेत आणि एकदा ते परत आल्यावर चाचण्यांच्या वाढलेल्या संख्येच्या आधारे परिस्थितीचे आकलन करू शकू. ”

loading image
go to top