झोपी गेलेलं प्रशासन जागे झाले! शाळकरी मुलींच्या 'Live Reporting' नंतर रस्ताची तात्पुरती मलमपट्टी

Karjat Kondhivade Road Potholes: कर्जत येथील कोंदीवडे-खांडपे रस्त्यावरील शाळकरी मुलींच्या 'Live Reporting' नंतर रस्ताची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Karjat-Kondhivade Road Potholes Repair

Karjat-Kondhivade Road Potholes Repair

ESakal

Updated on: 

कर्जत : कर्जत तालुक्यातील कोंदीवडे-खांडपे रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी खांडपे येथील ज्ञान मकरंद विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शनिवारी (ता. ८) छत्रीला माईक करून पत्रकारांच्या भूमिकेत विद्यार्थिनींनी रस्त्याची दुरवस्था मिश्कील शैलीत मांडली. हा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होताच प्रशासन जागे झाले असून रस्ताची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com