kalyan dombivli municipal corporation
Esakal
डोंबिवली : कोणतीही कर दरवाढ न करता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे २०२६-२७चे ३,१८६.६० कोटी रुपये उत्पन्न व ३,१८६.४९ कोटी रुपये खर्चाचे, तर १०.५१ लाख शिल्लक असलेले मूळ अंदाजपत्रक आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेस सादर केले. त्याचबरोबर २०२५-२६चे २,७४४.९९ कोटी रुपये जमा व २,१७२.२२ कोटी रुपये खर्चाचे सुधारित अंदाजपत्रकही सादर करण्यात आले.