

KDMC paid salary to staffer jailed in assault case
Esakal
कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका कर्मचाऱ्याला अत्याचार प्रकरणी ४० दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवलं होतं. या काळातही कर्मचाऱ्याला पगार दिल्याचं आता समोर आलं आहे. यामुळे पालिकेच्या अजब कारभाराची चर्चा आता रंगली आहे. इतकंच नाही तर पोलिसांनाही संबंधित आरोपी पालिकेत कार्यरत आहे याची माहिती उशिरा मिळाल्यानं पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. तब्बल ४० दिवस न्यायालयीन कोठडीत असूनही संबंधिताला नियमित पगार कसा दिला गेला? कामावर येत नसताना असं कसं होऊ शकतं? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.