KDMC: डॉक्टरांना मारहाणीचे प्रकरण तापले! रमेश म्हात्रे यांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, कल्याण न्यायालयाचे आदेश

Ramesh Mhatre: कल्याण महानगरपालिकेच्या रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी कल्याण न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Ramesh Mhatre Police Custody Till July 13

Ramesh Mhatre Police Custody Till July 13

ESakal

Updated on

कल्याण : कल्याण महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली. शिंदे शिवसेना गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजकारण तापले असून रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच कल्याण न्यायालयाने शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com