

MNS Backs Shinde Sena In KDMC Mayor Race
Esakal
KDMC Election: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मनसेनं पाठिंबा दिल्यानं आता तिथं युतीची सत्ता स्थापन होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. पण महापौर कुणाचा होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महापौर पद, इतर समित्यांबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्य रवींद्र चव्हाण हे घेणार असल्याचंही श्रीकांत शिंदे म्हणाले. कोकण भवनात शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे यांच्यासह मनसेचे राजू पाटील हे उपस्थित होते.