'केडीएमटी'ही कोरोनाच्या विळख्यात; एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूने भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 28 जून 2020

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत असून रविवारी (ता.28) 46 वर्षीय वाहकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या दोन झाली असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कल्याण ः कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत असून रविवारी (ता.28) 46 वर्षीय वाहकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या दोन झाली असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अरे बापरे... एका रात्रीत  मुंबईत आढळलेत अजस्त्र अजगर

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. याच दरम्यान कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून कल्याण पश्चिमेतील रामदास वाडीतील 47 वर्षीय बस चालकाला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी (ता.25) त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आज कोरोनामुळे 46 वर्षीय वाहकाचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केडीएमटीमधील आठ जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील दोघे बरे झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. चौघांवर उपचार सुरू आहेत.

सावधान ! कोरोनासह देशात मधुमेह बळावतोय; एकट्या महाराष्ट्रातील मधुमेही रुग्णांची संख्या वाचून धडकी भरेल

50 लाखांच्या विम्याची मागणी 
सरकारी नियमानुसार परिवहन उपक्रममधील कर्मचारी आणि अधिकारी वर्ग अत्यावश्यक सेवेत काम करत असून त्यांना ही आरोग्य सेवा द्यावी आणि 50 लाखांचा कोरोना विमा लागू करावा, अशी मागणी महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल पंडित यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

 

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारी धोरणानुसार मदत दिली जाईल. कोरोना बाधितांशी संपर्क आलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले असून कर्मचाऱ्यांनीही लक्षणे दिसल्यास पालिकेचे आरोग्य केंद्र आणि रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी आणि उपचार घ्यावेत.
- मारुती खोडके, व्यवस्थापक, केडीएमटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KDMT employee dies due to corona