esakal | सरकारच्या एका निर्णयामुळे ठाण्यातील आंतरराष्ट्रीय शाळा होणार बंद!
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील खर्डी येथील आंतरराष्ट्रीय शाळा होणार बंद

राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे. यासाठी तत्कालीन भाजप सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापना केले होते. परंतु, मविआ सरकारच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्रुटी असल्याचे कारण देत, हे मंडळ बरखास्त केले. या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथील आंतरराष्ट्रीय शाळा बंद होणार आहे.

सरकारच्या एका निर्णयामुळे ठाण्यातील आंतरराष्ट्रीय शाळा होणार बंद!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे. यासाठी तत्कालीन भाजप सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापना केले होते. परंतु, मविआ सरकारच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्रुटी असल्याचे कारण देत, हे मंडळ बरखास्त केले. या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथील आंतरराष्ट्रीय शाळा बंद होणार आहे. त्यामुळे पालकांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करत निषेध केला. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. तर यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. 

ही बातमी वाचली का? दोन हात, एका पायाने चित्र काढणारा अवलिया

ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्‍यातील खर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत 120 विद्यार्थी होते. दोन वर्षापासून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शाळा सुरु झाल्याने त्यात नर्सरी ते 4 थी पर्यंत 380 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खर्डी परिसरातील दळखण, दहिगाव,जरंडी, पळशीण व शिरोळ या गावातील पालकांनी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून, आपल्या पाल्याला या शाळेत शिक्षणासाठी टाकले होते. या शाळेत विद्यार्थ्यांच्या कला गुणाना वाव देऊन त्यांच्या आवडी नुसार व रोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी बाबतही शिक्षण मिळत आहे. विद्यार्थ्यांना विविध विषय हातळता येत असतात. यामुळे विद्यार्थ्यामध्ये शिक्षण घेण्याची आवड निर्माण होत असून, विद्यार्थी गुणवान होत असल्याचे पांडुरंग काळे यांनी सांगितले. या शाळेतील शिकविण्याच्या पद्धतीमुळे मुलाच्या बौद्धिक क्षमतेत वाढ झाली असून, जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत असल्याचे पालक सोमनाथ म्हस्कर यांनी सांगितले. सरकारने या निर्णायाचा पुनर्विचार करावा, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पालकांकडून निवेदन देण्यात आले. यावेळी पालक सोमनाथ म्हस्कर, मेघा पवार, स्वाती बागुल, अमोल आपटे यांच्यासहित अनेक पालक उपस्थित होते. 

ही बातमी वाचली का? एपीएमसीवर महाविकास आघाडीचा झेंडा
 
खाजगी शाळांची चांदी 
खर्डी येथील आंतरराष्ट्रीय शाळेत सामान्य पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळत होते. परंतु आता खाजगी इंग्रजी शाळेत लाखो रुपये शुल्क देऊन प्रवेश घेता येणार नसल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. या निर्णयामुळे खर्डी परिसरातील खाजगी शाळांची चांदी झाली आहे. 

ही बातमी वाचली का? कोंढाणे धरणाचे पाणी सिडकोला देणार नाही

लवकरच ठीय्या आंदोलन 
खर्डी येथील आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्याचे पालक मुंबईतील आझाद मैदानात लवकरच ठीय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा पालक संघटनेने दिला आहे. जो पर्यंत सकारात्मक निर्णय येत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवले जाणार नाही. असे पालक सोमनाथ म्हस्कर, पांडुरंग काळे, मेघा पवार व स्वाती बागुल यांनी सांगितले. 

"ग्रामीण भागातील खर्डीतील आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना जगातील शिक्षण पद्धत शिकवितात. या शाळेत विद्यार्थी आवडीने शिक्षण घेत असून, विद्यार्थ्याना सर्व प्रकारचे शिक्षण मिळत असल्याने गुणवान होत आहेत. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार केल्यास विद्यार्थ्यांच्या कला गुणाना वाव मिळेल. 
- मेघा पवार, पालक. 

loading image