कामोठेनंतर आता हे शहर हिटलिस्टवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष ; नियमांचे पालन न केल्यास रुग्णांत वाढ

खारघर : पनवेल पालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कामोठेनंतर खारघर हिटलिस्टवर येत असल्याचे दिसत आहे. येथील नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाही. जर नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर येथील रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

ठरलं तर! महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊन-४ सुरु होणार..वाचा काय असेल सुरु आणि काय बंद 

कामोठेनंतर आता हळूहळू खारघरमध्ये कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पनवेल महापालिकेतील सर्वांत मोठा नोड आणि शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर वसाहतीत उच्च शिक्षित नागरिक असूनही भाजी, मटण आणि मासळी मार्केटमध्ये अजूनही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. येणाऱ्या काही दिवसांत नागरिकांनी कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कामोठेनंतर खारघर हिटलिस्टवर असेल, यात शंका नाही.

एका ट्विटमुळे रेल्वेनं रुग्णासाठी मुंबईहून घरपोच पाठवली 'ही' गोष्ट.. सोलापूरचा कर्करुग्ण गेला भारावून 

कामोठे वसाहतीत 14 मार्चला एका 62 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पालिका हद्दीत दोन महिन्यांत 16 मेपर्यंत 246 रुग्ण आढळून आले आहे. त्यातील 111 रुग्ण बरे झाले आहे. त्यात कामोठेमधील 41, तर खारघरमधील 22 रुग्णांचा समावेश आहे. तर आठ व्यक्ती दगावले आहे. 

'बायको-मुलांसमोर दारू पिऊ कशी ?' घरपोच दारूचा पर्याय मिळाला मात्र  मद्यप्रेमींची घालमेल सुरू.. 

विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेले रुग्ण
एकूण बाधित 127
पनवेल 4
कळंबोली 19
नवीन पनवेल 15
कामोठे 51
खारघर 38

Kharghar on the hit list after Kamothe


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kharghar on the hit list after Kamothe