रायगड जिल्ह्यातील 'या' शहरानं असं हरवलं कोरोनाला, वाचा

khopoli corona
khopoli corona

खोपोली : देशात व राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना खोपोलीत प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे शहर कोरोनामुक्त आहे. सर्वच अधिकारी, कर्मचारी, पोलिस, लोकप्रतिनिधी, आरोग्य आणि स्वच्छता विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पोलादपूर, श्रीवर्धन ते अगदी बाजूच्या नेरळमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असताना खोपोली हे जिल्ह्यातील मोठे शहर मात्र आजही सुरक्षित आहे. स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाला खोपोलीत प्रवेशच करू द्यायचा नाही अशा जिद्दीने काम सुरू आहे. शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात आहे. रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्या वाहनांवर नियंत्रण रहावे यासाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. 

नियोजनाला नागरिकांचा प्रतिसाद
भाजी विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून आता शहराच्या सर्वच भागात भाजी उपलब्ध करण्यात आली आहे. किराणा सामान आणि भाजी घरपोच देण्यासाठी पालिकेने घरपोच सेवा या अँपची निर्मिती केली असून लोकांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे.

 khopolikar succeed in stopping the corona, read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com