वांद्र्यातील व्यावसायिकाच्या मुलीचे अपहरण; गुन्हे शाखेकडून काही तासात सुटका

मुंबई उपनगरातील वांद्रे येथून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर काही तासांतच मुलीची सुटका करण्यात पोलिसाना यश मिळाले आहे.
Crime
Crimesakal
Summary

मुंबई उपनगरातील वांद्रे येथून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर काही तासांतच मुलीची सुटका करण्यात पोलिसाना यश मिळाले आहे.

मुंबई - मुंबई उपनगरातील वांद्रे येथून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर काही तासांतच मुलीची सुटका करण्यात पोलिसाना यश मिळाले आहे. सुटका करण्यात आलेली पिडीत मुंबईतील व्यावसायिकाची कन्या असल्याची माहिती मिळत आहे. एका 18 वर्षीय तरुणाने अपहरण केल्याची माहिती असून त्याच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

रविवारी 6 नोव्हेंबर रोजी पहाटे वांद्रे येथील राहत्या घराजवळून पिडीत मुलगी बेपत्ता झाली. पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, किशोरवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी टिपलेल्या फुटेजची तपासणी केली.त्यातील एका कॅमेरात एका तरुणाने पिडीत मुलीला सोबत नेल्याचे आढळले. मुलीचे लोकेशन ट्रेस करताना पोलिसाना पिडीत मुलगी दहिसरला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रविवारी रात्री तरुणीचा माग काढत दहिसरमधून तिची सुटका केली.

आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 353 (अपहरण), 354 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी) भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा अंतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरुणाने अपहरण करण्यामागे काय हेतू होता याचा तपास करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com