
सोमय्या सहकुटुंब पोलीस ठाण्यात दाखल, राऊतांविरोधात तक्रार
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी चारित्र्यहनन केल्याप्रकरणी संजय राऊतांच्या विरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. आयपीसी ५०३, ५०६ आणि ५०९ अंतर्गत पोलिसांनी एफआयआर दाखल करावी, अशी मागणी सोमय्यांनी केलीय. मिरा-भाईंदरमध्ये शौचालय घोटाळ्यात राऊत यांनी मेधा सोमय्यांवर आरोप केले होते. (Kirit somaiya files complaint against Sanjay Raut)
सोमय्या कुटुंबीयांनी १०० कोटींचा घोटाळा करत सर्वसामान्यांचा पैसा लाटल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याप्रकरणात माफी मागण्यासाठी सोमय्यांनी अल्टिमेटम दिला होता. मात्र राऊतांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने सोमय्यानी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुलूंडच्या पोलीस ठाण्यात सोमय्या कुटुंबीयांसह दाखल झाले. (Kirit Somaiya)
हेही वाचा: किरीट सोमय्या मनसुख हिरेन कुटुंबीयांच्या भेटीला; शर्मा- वाझे नवे लक्ष्य
मिरा-भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना मिळालं. त्यांचं युवक प्रतिष्ठान आहे. यामार्फत हे कंत्राट मार्गी लावण्यात आलं. मात्र, बनावट कागदपत्रे सादर करून, पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
साडे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.
Web Title: Kirit Somaiya Files Defamation Against Sanjay Raut Over Toilet Scam Prob
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..