Ulhasnagar Municipal Corporation
Ulhasnagar Municipal Corporationsakal

Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर किशोर गवस यांची एन्ट्री

काही महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त डॉ.करुणा जुईकर आणि अलीकडेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तीन वर्षे पूर्ण झालेले उपायुक्त अशोक नाईकवाडे व प्रियंका राजपूत यांची बदली झाल्याने ही तिन्ही पदे रिक्त आहेत.

उल्हासनगर : काही महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त डॉ.करुणा जुईकर आणि अलीकडेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तीन वर्षे पूर्ण झालेले उपायुक्त अशोक नाईकवाडे व प्रियंका राजपूत यांची बदली झाल्याने ही तिन्ही पदे रिक्त आहेत.

त्यामुळे महानगरपालिकेच्या विविध विभागांचा कारभार हा आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व उपायुक्त डॉ.सुभाष जाधव यांच्या खांद्यावर आला होता.आता 27 तारखेला वसई विरार महानगरपालिकेचे किशोर गवस यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर एन्ट्री झाली आहे.महाराष्ट्र शासनाने गवस यांना प्रतिनियुक्तीवर पाठवलेले आहे.

किशोर गवस यांनी पदभार स्वीकारला असून आयुक्त अजीज शेख,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव,सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.गवस यांच्या एन्ट्री मुळे अधिकाऱ्यांत विभागांची विभागणी अपेक्षित मानली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com