भारतात का आहे मुला-मुलींच्या लग्नाच्या वयात फरक ?

भारतात का आहे मुला-मुलींच्या लग्नाच्या वयात फरक ?
Updated on

मुंबई - भारतात मुलांचं लग्नाचं वय २१ तर मुलींसाठी मात्र १८ असं वेगवेगळं का ? यामागे नेमकं कारण काय ? याला काही वैज्ञानिक संदर्भ आहेत का ? हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का ? मात्र याबद्दल जाणून घेताना थोडं इतिहासात डोकावणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला यामागचा इतिहास सांगणार आहोत. भारतात अनेक वर्ष ब्रिटिशांची सत्ता होती. भारतातील अनेक नियम आणि कायदे हे ब्रिटिशकालीन आहेत. दरम्यान वेळोवेळी या नियमांमध्ये आणि कायद्यांमध्ये बदल केले गेलेत. लग्नाच्या वयाबद्दल देखील वेळोवेळी कायद्यात बदल केले गेलेत. 

भारतात बालविवाहासारखी अनिष्ट परंपरा होती. ही परंपरा नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांनी पावलं उचलली होती. १८६० मध्ये IPC म्हणजेच इंडियन पिनल कोडनुसार  १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी शरीरसंबंध ठेवणे गुन्हा होता, मात्र त्या काळात १० वर्षाखालील मुलीशी लग्न करणे हा गुन्हा नव्हता आणि त्यावर बंदीही नव्हती. 

त्यानंतर १९२७ मध्ये पहिल्यांदा 'एज ऑफ कन्सेंट' बिल आणलं गेलं या बिलाच्या माध्यमातून १२ वर्षांपेक्षा कमी वर्षांच्या मुलीशी लग्न करण्यावर प्रतिबंध होते. या बिलानंतर पहिल्यांदा भारतात लग्नाच्या वयवरील कायदा आला. या कायद्याचं नाव होतं 'बालविवाह विरोधी कायदा'. हा कायदा १९२९ मध्ये पारित करण्यात आला.  या कायद्यानुसार पहिल्यांदाच लग्नासाठी मुलींचं १६ तर मुलांचं १८ वर्षे असं वय निश्चित केलं गेलं.

पुढे भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी १९५५ मध्ये 'हिंदू मॅरेज ऍक्ट पारित' करण्यात आला. यामध्ये मुलांचं लग्नाचं वय १८ तर मुलींचं वय १५ ठेवण्यात आलं. पुढे १९७८ मध्ये हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये आणखीन संशोधन करण्यात आलं. नवीन संशोधनानुसार या कायद्यात पुन्हा बदल केला गेला. सुधारित कतयद्यानुसार आता मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ असणे गरजेचे आहे. 

भारतात अनेक जाती धर्माची लोकं राहतात. अशात ब्रिटिशांनी आणलेल्या बालविवाह विरोधी कायद्याला मुस्लिम बांधवांकडून विरोध झाला. दरम्यान मुस्लिम समाजासाठी लग्नाचा वेगळा कायदा आहे. २०१२ मध्ये दिल्ली उच्चं न्यायालयाने याबाबत निर्णय दिलाय. ज्यामध्ये मुस्लिम मुली मासिक पाळी सुरु झाल्यानंतर स्वेच्छेने लग्न करू शकतात. याचबरोबर शिख धर्मासाठी देखील लग्नासंदर्भात वेगळा कायदा आहे.

दरम्यान हा सर्व इतिहास पाहता भारतात मुलामुलींच्या लग्नाच्या वयातील फरक हा केवळ भारतातील पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपरांमुळे आहे, त्याला वैज्ञानिक असं कोणतंही कारण नाहीये.

know why there is difference between minimum age for getting married for male and female

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com