त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून राखली राष्ट्रध्वजाची शान...

त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून राखली राष्ट्रध्वजाची शान...

मुंबई : आज जीएसटी भवनाला अचानक लागलेल्या आगीत कुणाल जाधव या सद्गृहास्ताने समयसूचकता दाखवत आगीच्या विळख्यात सापडणाऱ्या राष्ट्रध्वजाला सुरक्षित उतरवले. त्यामुळे कुणाल जाधव यांच्या शौर्याचं कौतुक होतं आहे. कुणाल जाधव हे १६ वर्षांपासून जीएसटी भवनात शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

आज जीएसटी भवन इमारतीला अचानक आग लागली होती. या आगीने इमारतीचे काही माजले आगीच्या कचाट्यात सापडलेत. अशात या आगीचे लोळ राष्ट्रध्वजापर्यंत आगीचे लोळ पोहोचले. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर शिपाई कुणाल जाधव यांनी स्वत:च्या जिवाची परवा न करता राष्ट्रध्वज मनपूर्वक सुरक्षितपणे खाली उतरवला.  कुणाल जाधव यांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

"आपल्या देशाच्या झेंड्यापर्यंत आगीचे लोळ जात होते, हे पाहून माझं मन हेलावलं आणि देशप्रेमाच्या भावनेतून आपण हा तिरंगा सन्मानपूर्वक खाली उतरवला”,अशा भावना कुणाल जाधव यांनी व्यक्त केल्या आहेत.

आज दुपारी साडे बाराच्या सुमारास जीएसटी भवनाला आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तब्बल २० गाड्या, ६ क्रेन्स तर १००हून अधिक जवान उपस्थित होते. तब्बल ३ तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दरम्यान आगीची बातमी समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीची  बैठक सोडून घटनास्थळी पोहोचले होते. ज्यावेळी ही आग लागली तेव्हा नवव्या मजल्यावर असलेल्या तिरंग्यापर्यंत ती पोहचली असती. हा धोका लक्षात घेऊन कुणाल जाधव यांनी तातडीने स्वतःचा जीव धोक्यात घालून राष्ट्रध्वज आगीपासून वाचवला. त्यामुळे कुणाल पाटील यांच्या शौर्याला सलाम.  

kunal jadhav saved indian flag while mumbai gst bhavan fire was at peak

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com