

कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या अलिकडच्याच एका कार्यक्रमात केलेल्या विडंबनामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झालाय. कुणाल कामराच्या कार्यक्रमानंतर जिथं शूटिंग झालं त्या स्टुडिओची तोडफोडही शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी केली. कुणाल कामराने माफी मागावी अशी मागणी केली जातेय. कुणाल कामराने त्याच्या कार्यक्रमात ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी असं विडंबन केलं होतं. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून त्याला धमक्याही देण्यात आल्यात. यातच आता कुणाल कामराने शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पुन्हा डिवचलंय.