
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून टीका केली होती. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जिथं कामराच्या कार्यक्रमाचं शूटिंग झालं होतं तो स्टुडिओ फोडला होता. तर त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण दिलंय. त्याला जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नसल्याचं न्यायालयाने सांगितलं. कुणाल कामराच्या जीवाला धोका असून तो मुंबईत आल्यास त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचंही न्यायालयाने म्हटलंय.