

Kunal Kamra: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळं सध्या महाराष्ट्रात वादळ उठलंय. कामचाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिथं हा शो झाला त्या हॅबिटॅट स्टुडिओवर जाऊन शिवसैनिकांनी प्रचंड तोडफोड केली होती. यानंतर कुणाल कामरा यानं अधिकृतरित्या तीन पानी पत्राद्वारे आपलं स्टेटमेंट प्रसिद्ध केलं. यामध्ये त्यानं या तोडफोडीवरही भाष्य केलं.
यानंतर बीएमसीनं मुंबईतील ऐतिहासिक एलफिस्टन पूलावर हातोडा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पण हे खरंच कामराच्या पोस्टमुळं घडलंय की निव्वळ योगायोग आहे, जाणून घ्या.