
कुर्ला (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर सोमवारी सायंकाळी उशिरा वेगात असलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने तीन जण ठार तर २५ जखमी झाले. एसजी बर्वे मार्गावरील अंजुम-ए-इस्लाम शाळेसमोरील एल वॉर्डजवळ रात्री ९.५० च्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अपघात कसा घडला याचे दृश्य दिसत आहे.