

Kurla Crane Collapse Accident
ESakal
मुंबई : कुर्ला पूर्व येथील इंदिरा नगर परिसरात पाडकाम कारवाईदरम्यान भीषण अपघात घडला. १७ मजली इमारतीच्या गच्चीवर पोकलेन मशीन चढवत असताना हायड्रॉलिक क्रेन उलटून तिचा काही भाग तुटून लगतच्या झोपड्या, हायटेन्शन रेल्वे लाइन आणि गाड्यांवर कोसळला. शुक्रवारी पहाटे ३:०४ वाजता घडलेल्या या दुर्घटनेत १० जण जखमी झाले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.