

Kurla Phoenix Mall Mumbai Crime
ESakal
मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील पालिकेच्या उद्यानात एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. उद्यानात एक तरुण आणि तरुणी उद्यानात फोटो काढत असताना आठ ते दहा अल्पवयीन मुलांनी त्यांची छेडछाड काढली असून त्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला याप्रकरणी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.