

Kurla Phoenix Mall Crime
ESakal
घाटकोपर : कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळ असलेल्या प्रमोद महाजन उद्यानात एका तरुण-तरुणीला आठ ते दहा अल्पवयीन मुलांनी छेडछाड करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांची ४ डिसेंबरपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.