esakal | आता हे काय नवीन; म्हणे 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स होता.. वाचा कोणी केलाय हा आरोप...
sakal

बोलून बातमी शोधा

2011 wc

मुंबई येथे झालेला 2011 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा पराभव करत 1983 नंतर प्रथमच विश्वकरंडक जिंकण्याची किमया केली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली होती.

आता हे काय नवीन; म्हणे 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स होता.. वाचा कोणी केलाय हा आरोप...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलंबो : मुंबई येथे झालेला 2011 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा पराभव करत 1983 नंतर प्रथमच विश्वकरंडक जिंकण्याची किमया केली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली होती. मात्र हा अंतिम सामना आमच्या संघाने भारताला विकला होता, असा आरोप श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांनी केला आहे.

माहिम रेल्वेस्थानकावर कोरोना वॉरिअर्सना अनोखी मानवंदना

महिंदनंदा अलुतगमांगे यांनी हा आरोप केला आहे. महिंदनंदा 2011 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री होते. मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात आमच्या संघाने जाणीवपूर्वक हार स्विकारली, असे महिंदनंदा यांनी सिरासा टिव्हीला मुलाखत देताना सांगितले.

आता सादिकचा गेमच करतो म्हणत नवनीत पहाटे चार वाजता गेला सादिकच्या घरी, सादिकने दरवाजा उघडला आणि....

आपण हे अतिशय जबाबदारीने विधान करत असल्याचे महिंदनंदा म्हणतात; परंतु आपल्याकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचेही ते म्हणतात. देशहितासाठी मला अधिक खोलवर जायचे नाही; परंतु भारताविरुद्धचा अंतिम सामना आम्ही जिंकायला हवा होता, असे त्यांनी सांगितले.

मुंबईकर विराट घेतोय महानगरीतील मान्सूनचा आनंद...

त्या जाणीवपूर्वक पराभवास खेळाडू जबाबदार नव्हते, तर कोणी तरी बाहेरून हे कृत्य केले, असेही ते म्हणतात, पण नेमका कोणाचाही उल्लेख केला नाही. वानखेडे स्टेडियमवर झालेला तो अंतिम सामना भारताने 10 चेंडू आणि सहा विकेटने जिंकला होता. श्रीलंकेकडून माहेला जयवर्धनेने नाबाद 103 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेने 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या होत्या. भारताकडून गौतम गंभीरने 97 तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली होती.