esakal | कलम १४४ संदर्भात नवा आदेश; गणेशोत्सव मंडळाशी चर्चेनंतर नांगरे-पाटील यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

vishwas nangre

लालबागच्या राजाच्या दर्शनाला होणारी गर्दी रोखणं कठीण आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी १४४ कलमाअंतर्गत दोन्ही बाजुची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता असे विश्वास नांगरे-पाटील म्हणाले.

कलम १४४ संदर्भात नवा आदेश; मंडळासोबत नांगरे-पाटील यांची चर्चा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लालबागच्या राजाच्या प्राण प्रतिष्ठापनेला होत असलेला उशिर आणि दुकाने बंद असल्याने नागरिकांमधून प्रश्न विचारले जात होते. त्यानंतर मुंबई पोलिस कायदा सुव्यवस्था सहायुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी १४४ कलमानुसार निर्बंध घालण्यात आल्याची माहिती दिली. तसंच यामध्ये थोडी सूट देऊन नवे आदेश लवकरच जारी केले जातील असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्यक्ष आणि मूख दर्शनाला निर्बंध आहेत. लालबागच्या गणपतीबाबत लोकांचे भावनिक संबंध आहेत. इथं देशभरातून लोक येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनाला होणारी गर्दी रोखणं कठीण आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी १४४ कलमाअंतर्गत दोन्ही बाजुची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता असे विश्वास नांगरे-पाटील म्हणाले.

लालबागच्या मंडळासोबत चर्चा करून निर्य़ण घेतला आहे. दुकान मालक आणि एक कामगार यांना पास दिले जातील. आरतीच्या वेळी फक्त दहा लोक असतील. एकत्र १०० लोकं नकोत. यात काही उल्लंघन झाल्यास १४४ कलमानुसार कारवाई होईल. बाप्पाचे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दर्शन घ्या असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती लाईव्ह दर्शन

गेल्यावेळी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने आरोग्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम घेतला. यंदा दहा दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय हा १४४ कलमानुसार घेतला होता. पण सध्याच्या परिस्थितीत तोडगा काढून याबाबतचे आदेश तासाभरात देण्यात येतील. पोलिसांची गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. कोणी दर्शनासाठी गर्दी करणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. आरतीसाठी दहा लोक कोण् असतील याच्याशी काही देणं घेणं नाही. यात तंत्रज्ञांना परवानगी असेल असेही ते म्हणाले.

समन्वयाने यातून मार्ग काढला आहे. मुंबई पोलिस प्रशासन जे आदेश देईल त्याचे पालन करू. आमच्या चर्चेत योग्य असा तोडगा निघाला असून आम्ही यावर समाधानी आहे आणि लालबागच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात होईल अशी माहिती लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image
go to top