लालबाग गॅस सिलिंडर दुर्घटना: आणखी एकाचा मृत्यू मृतांची संख्या 9 वर

लालबाग गॅस सिलिंडर दुर्घटना: आणखी एकाचा मृत्यू मृतांची संख्या 9 वर

मुंबई: रविवार 6 डिसेंबर रोजी लालबाग येथील साराभाई इमारतीतील एका घरात गॅस सिलिंडर मधून गॅस गळती होऊन स्फोट झाला होता. या दुर्घटनेत शनिवारी संध्याकाळी भायखळा येथील मसीना रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले होते. 

लालबाग गणेश गल्ली येथील साराभाई इमारतीत 6 डिसेंबरला सकाळी 7.45 च्या सुमाराला ही दुर्घटना घडली. या घटनेत 16 जण जखमी झाले होते. तर जखमींपैकी 12 जण गंभीर होते. यातील केईएममध्ये उपचार घेत असलेल्या 7 जणांचा मृत्यू झाला असून मसीना रुग्णालयात शनिवारी सायंकाळी 4.20 वाजता बिपीन (50) यांचा मृत्यू झाल्याने मसीना रुग्णालयात आतापर्यंत 2 जखमींचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मसीना रुग्णालयात दाखल जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून 3 जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर केईएम रुग्णालयात 3 जखमींना घरी सोडण्यात आले आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे) 

Lalbaug Cylinder blast subsequent fire 1 dead 16 suffer burn injuries
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com