
Lalbaugcha Raja Visarjan Stuck After Raft Fails to Carry Idol
Esakal
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास होत आले आहेत. लालबाग राजाची मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दोन तासांपूर्वी दाखल झालीय. मात्र अद्याप विसर्जन होऊ शकलं नाहीय. यंदा विसर्जनासाठी आणलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवता आली नाहीय. त्यासाठी तब्बल दीड तास प्रयत्न केले गेले पण त्यात यश आलं नाही. अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचण निर्माण झालीय. अत्याधुनिक तराफा मोटराइज्ड आहे. त्याला बोट जोडण्याची आवश्यकता नाही. पण या तराफ्यावर मूर्ती चढवण्याचे प्रयत्न गेल्या दीड तापासून सुरू आहेत.