
Lalbaugcha Raja Visarjan stalls idol stuck in water barge fails to lift immersion delayed in Mumbai
Esakal
मुंबईत गणेश विसर्जन मिरवणूक गेल्या २६ तासांपासून सुरू आहे. अजूनही मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल होत आहेत. प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या विसर्जनात मात्र विघ्न आलंय. मूर्ती सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर आली. पण यंदा आणण्यात आलेल्या नव्या तराफ्यावर मूर्ती चढवता न आल्यानं विसर्जन रखडलं आहे. भरतीमुळे पाणी वाढल्यानं मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अपयश आलंय. आता पाणी कमी होईपर्यंत मूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवली जाईल.