लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेचे सारथी कोरोनाच्या लढाईत हरले; जितेंद्र आव्हाडांनी केली होती मदत...

सुचिता करमरकर
Thursday, 23 July 2020

1990 मधे भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ येथून यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेसाठी वाहनचालक म्हणून सलीम यांनी पूर्णवेळ काम केले होते.

कल्याण : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी राम मंदिर उभारणीसाठी देशभरात रथयात्रा केली होती. यात्रेमध्ये अडवाणींच्या रथाचे सारथ्य करणारे सलीम मखानी यांचे आज निधन झाले. मागील वीस दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील इस्पितळात कोरोनावर उपचार सुरु होते.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालानंतर 'इथे' मिळणार गुणपत्रिका...

1990 मधे भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ येथून यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेसाठी वाहनचालक म्हणून सलीम यांनी पूर्णवेळ काम केले होते. राम मंदिर उभारणीची तयारी सुरु असतानाच त्यांचे निधन झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सलीम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

लॉकडाऊनमध्येही दिलासादायक बाब; कौटुंबिक हिंसाचारात झाली मोठी घट... 

सलीम मखानी यांची शास्त्रीनगर रुग्णालयातील व्हरांड्यात खुर्चीत बसून उपचार घेण्याची वेळ आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मदतीसाठी धाव घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने दोन महागडी इंजेक्शन सलीम मखानी यांना उपलब्ध करून दिली होती.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lalkrishna adwanis rathyatra driver salim makhani passed away amid corona infection