लॉकडाऊनमध्येही दिलासादायक बाब; कौटुंबिक हिंसाचारात झाली मोठी घट... 

अनिश पाटील
Thursday, 23 July 2020

गेल्या तीन महिन्याची आकडेवारी पाहता जून महिन्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या कलम 498 अंतर्गत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. तर एप्रिल महिन्यात केवळ 4 गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबई : कोरोना संकटावर मात करण्यासाठी मिशन बिगिन अगेन अंतर्गत देशांत लॉकडाऊनचा सहावा टप्पा सुरु झाला असून, त्यात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली आहे. कोरोनाच्या संकट काळातही एक समाधानाची बाब घडली आहे, ती म्हणजे या दरम्यान कौटुंबिक अत्याचाराचे प्रमाण घटल्याचे समोर आले आहे.

कठीण धड्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, मुंबईत लवकरच ५ हजार खाटांचं कोविड रुग्णालय

गेल्या वर्षीच्या कौटुंबिक अत्याचाराच्या प्रमाणांत या वर्षी 88 टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाउनमध्ये वर्क फ्रॉम होम असल्याने दिवसभर कामानिमित्त बाहेर राहणारे पती-पत्नी एकमेकांसमोर होते. त्यामुळे त्याच्यातील सुसंवाद वाढत गेला. त्यामुळेच कदाचित कौटुंबिक वाद कमी झाल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञाने व्यक्त केले आहे. मात्र, त्यातूनही काही ठिकाणी कलम 498 अंतर्गत खटले दाखल झालेत. त्याचा अधिक तपास करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी दाखल झालेल्या तक्रारी पुन्हा मागे घेण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.

कोरोनाबाधितांची घुसमट थांबणार! वाशीच्या प्रदर्शन केंद्रातील 500 खांटांचे ऑक्सिजन सुरू...

गेल्या तीन महिन्याची आकडेवारी पाहता जून महिन्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या कलम 498 अंतर्गत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. तर एप्रिल महिन्यात केवळ 4 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र त्यातूनही अनेक प्रकरणांमध्ये सामंजस्याने गुन्हे मागे घेण्यासाठीही अर्ज करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

यशस्वी वैमानिक होऊन बापाचं कर्ज फेडणाऱ्या 'या' महिलेची यशोगाथा नक्की वाचा

तर दुसरीकडे 2019 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना अधिक होत्या.गेल्या वर्षी जून महिन्यात कौटुंबिक अत्याचाराच्या कलम 498 अंतर्गत 74 गुन्हे दाखल झाले होते. तर मे 2019 मध्ये 49 गुन्हे तर एप्रिल 2019 मध्ये 62 गुन्हे दाखल झाले होते. तर यातील बरीच प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. तसेच इतर प्रकरणाचा तपास सुरु आहे.
---
(संपादन ः ऋषिराज तायडे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no of police cases about domestic violences decreases in lockdown