दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालानंतर 'इथे' मिळणार गुणपत्रिका...

संजय घारपुरे
Thursday, 23 July 2020

मुंबई विभागात गुणपत्रिकेचे वाटप करण्यासाठी दोन दिवस राखून ठेवले जाणार आहेत. त्यासाठीच्या केंद्रात वाढ होईल तसेच केंद्रातील कक्षही वाढवण्यात येणार आहेत.

मुंबई : दरवर्षी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर त्यांच्या गुणपत्रिका संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातच मिळत असते. मात्र, कोरोना महामारीमुळे गुणपत्रिका प्रदान करण्याच्या पद्धतीत बदल होईल, अशी चर्चा होती, मात्र, आता त्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद असताना आणि अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने गुणपत्रिका वाटपासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे.

यशस्वी वैमानिक होऊन बापाचं कर्ज फेडणाऱ्या 'या' महिलेची यशोगाथा नक्की वाचा

यंदा दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा महाविद्यालयातच देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक महामंडळ याबाबतच्या सूचना विभागीय कार्यालय तसेच शाळा, महाविद्यालयांना देणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देताना नियमाचे कसोशीने पालन करण्याची सूचना देण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

कोरोनाबाधितांची घुसमट थांबणार! वाशीच्या प्रदर्शन केंद्रातील 500 खांटांचे ऑक्सिजन सुरू...

दहावी तसेच बारावीची गुणपत्रिका विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची असते. त्यामुळे ती प्रत्येक विद्यार्थ्यालाच देण्याची गरज आहे. ती चूकीच्या हाती पडल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकेसाठी शाळा अथवा महाविद्यालयात जावे लागमार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करताना पूर्णपणे खबरदारी घेतली जाणार आहे, असे राज्य महामंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी सांगितले. ही गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देत असताना सुरक्षित अंतराचे पालन होईल तसेच सर्व प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येणार आहेत. 

कठीण धड्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, मुंबईत लवकरच ५ हजार खाटांचं कोविड रुग्णालय

मुंबई विभागात गुणपत्रिकेचे वाटप करण्यासाठी दोन दिवस राखून ठेवले जाणार आहेत. त्यासाठीच्या केंद्रात वाढ होईल तसेच केंद्रातील कक्षही वाढवण्यात येणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयांचे प्रतिनिधी गुणपत्रिका घेऊन जातील. आत्तापर्यंत हे वाटप काही तासात होत असे, पण आता यासाठी दोन दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना दिवस ठरवून देण्यात येणार आहे, असे मंडळाच्या मुंबई विभागाचे सचिव संदीप सांगवे यांनी सांगितले.

अभिनेत्री रसिका दुग्गलच्या नृत्यावर तुम्हीही थिरकणार; वाचा सविस्तर...​

महाविद्यालये या गुणपत्रिका वाटप कार्यक्रमाबाबत समाधानी नाहीत. महाविद्यालयात एक हजार विद्यार्थी शिकत असतात. ते शहराच्या विविध भागातून येतात. सध्या कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे हे विद्यार्थी कसे येऊ शकतील, अशी विचारणा महाविद्यालयातून होत आहे. मुंबई विद्यापीठाने पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. बारावीचा निकाल 16 जुलैस लागला आहे, तर दहावीचा निकाल या महिनाअखेर अपेक्षित आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students of ssc and hsc will get their marksheets at their respective school and collges