
Lalbaugcha Raja Darshan
ESakal
मुंबई : मुंबईतील लालबाग येथील सर्वात प्रतिष्ठित गणपती 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी जमते. भाविक तासंतास रांगेत उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतात. हे गणेश मंडळ केवळ उत्सवाचा थांबा नसून वर्षातून एकदा येणारी आध्यात्मिक यात्रा आहे. जिथे "गणपती बाप्पा मोरया" आणि 'लालबाच्या राजाचा विजय असो' या जयघोषाने परिसर दुमदुमून जातो. दरम्यान काही भाविकांनी अजूनही मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित गणपतीला भेट दिली नसेल, तर आज लालबागचा राजाचे आशीर्वाद घेण्याची शेवटची संधी असू शकते.