ऑगस्टचे शेवटचे दिवस मुंबईसह ठाणे, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीत कोरडे जाणार

समीर सुर्वे
Thursday, 27 August 2020

पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत पुन्हा उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. दुपारच्या वेळी हा तडाखा जास्त जाणवतोय.

मुंबई : पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत पुन्हा उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. दुपारच्या वेळी हा तडाखा जास्त जाणवतोय. आज मुंबईत कुलाबा येथे सरासरी पेक्षा 1.6 अंश सेल्सिअस जास्त तापमानाची नोंद झाली. तर उद्याही अशीच परीस्थीत राहाणार आहे. 31 ऑगस्ट पर्यंत मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग परीसरात हलक्‍या पावसाचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला असून शनिवारी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा असून अंबर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर, पालघर जिल्ह्यात उद्या जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

मोठी बातमी - मुंबई पोलिसांची 'दिशा' कोणी बदलली? सुशांतसिंह प्रकरणी नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्या नेत्यावर गंभीर टीका

मुंबईत कुलाबा येथे आज संध्याकाळ पर्यंत 31.4 कमाल आणि 26.5 किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान सरासरी पेक्षा 1.5 अंशांनी तर किमान तापमानात सरासरीच्या 1.5 अंशांनी वाढ झाली आहे. मुंबई वेधशाळेने गुरुवारी 2 वाजता वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी मुंबईतील तापमान याच पातळीवर राहाणार असून शनिवारी तापमानात किंचीत घट होईल. ऑगस्टचे शेवटचे दिवस मुंबईसह ठाणे, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोरडे जाणार आहेत.

मोठी बातमी - मध्य रेल्वेकडून मुंबईतील लोकल सुरु करण्याबाबत आली महत्त्वाची बातमी

पालघर आणि रायगड जिल्हात उद्या जोरदार पावसाची शक्‍यता आहे.तर,रायगड मध्ये शनिवारी अतिवृष्टीचा अंदाज आहे.या दिवशी जिल्हातील काही भागात 204 मि.मी पर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली.त्यामुळे वेधशाळेने अंबर अलर्ट जाहीर केला असून नाविक दल,तटरक्षक दल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्जतेचा इशारा दिला आहे.

last days of august will be without rain in mumbai thane ratnagiri and sindhudurga


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: last days of august will be without rain in mumbai thane ratnagiri and sindhudurga