मुंबईत सातत्याने घडणाऱ्या गोळीबार आणि खंडणीच्या प्रकरणांमध्ये कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचे नाव आघाडीवर येत असले, तरी मुंबई पोलिसांना अद्याप त्याचा प्रत्यक्ष ताबा मिळवता आलेला नाही. .गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला मुंबईत आणण्यात केंद्रीय गृह मंत्रालयाचा एक विशेष कायदेशीर आदेश सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. या आदेशामुळे मुंबई पोलिसांना त्याच्या प्रत्यक्ष कोठडीपासून दूर राहावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे..अभिनेता टायगर श्रॉफच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या ताज्या घटनेनंतर मुंबई पोलीस बिश्नोईचा ताबा का घेत नाहीत, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे..CrPC 268 and BNSS 303 bar : नेमका काय आहे गृह मंत्रालयाचा आदेश?केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम २६८ (आताच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता - BNSS च्या कलम ३०३) अंतर्गत एक विशेष अधिसूचना जारी केली होती. .या आदेशानुसार, सुरक्षेचे गंभीर कारण पुढे करत लॉरेन्स बिश्नोईला कोणत्याही कारणासाठी साबरमती कारागृहाच्या आवाराबाहेर नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा आदेश सुरुवातीला एका वर्षासाठी लागू करण्यात आला होता; मात्र, त्यानंतर त्याला दरवर्षी मुदतवाढ दिली जात आहे. या निर्बंधांमुळे देशभरातील कोणत्याही न्यायालयाला किंवा तपास यंत्रणेला त्याला प्रत्यक्ष हजर करण्याचे निर्देश देता येत नाहीत..Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप.Security threat and gang war risks : गँगवॉरचा धोका अन् कायदा-सुव्यवस्थालॉरेन्स बिश्नोई विरोधात देशभरात दाखल असलेले गंभीर गुन्हे, त्याचे आंतरराज्यीय नेटवर्क आणि त्याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. .त्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेत असताना प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून हल्ला होण्याची किंवा गँगवॉर भडकण्याची शक्यता गृहीत धरून त्याला साबरमती कारागृहातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोणत्याही खटल्याच्या किंवा चौकशीच्या सुनावणीसाठी केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचाच (VC) वापर केला जातो..Mumbai Police investigation hurdles : मुंबई पोलिसांच्या तपासाला मर्यादाया कायदेशीर ढालीमुळे मुंबई पोलीस क्राईम ब्रँचला बिश्नोईला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणून समोरासमोर कसून चौकशी करता येत नाही. मुंबई पोलिसांना त्याची चौकशी करायची असल्यास न्यायालयाची रीतसर पूर्वपरवानगी घेऊन साबरमती कारागृहात जाऊनच जबाब नोंदवावा लागतो किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर समाधान मानावे लागते. .आयफोन ड्युओचा स्क्रीन फुटला? रिपेअरिंगचा खर्च ऐकून धक्का बसेल!.परिणामी मुंबईत घडलेल्या गोळीबाराच्या कटाचे धागेदोरे उलगडताना पोलिसांना केवळ स्थानिक हस्तक आणि शूटर यांच्या चौकशीवरच अवलंबून राहावे लागत असून, टोळीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात मोठे कायदेशीर आव्हान कायम आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.