
बदलापूर : अखेर दोन दिवसांनी तो सापडला. तो शुद्धीत आला. तो भेदरलेल्या अवस्थेत; शरीर थकलेले, तहान आणि भुकेने घसा सुकलेला, पण अखेर दोन दिवसांनी त्याच्या पोटात अन्न गेले आणि मग त्याच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा (Forest authorities) जीव भांड्यात पडला. बदलापुरात पाण्याच्या भांड्यात डोकं अडकलेल्या बिबट्याची सुटका (Leopard rescue) केल्यानंतर आता त्याची रवानगी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay gandhi national park) करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर तिथे उपचार करण्यात आले.
रविवारी रात्री बदलापूरजवळील गोरेगावच्या एका फार्महाऊसवर जाणाऱ्या कुटुंबाने पाण्याच्या भांड्यात तोंड अडकलेल्या बिबट्याला पाहिले. त्यानंतर त्याची माहिती वन विभागाला दिली. रविवारी रात्रीपासून वनाधिकारी, प्राणिमित्र आणि ग्रामस्थांच्या ४८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याचा शोध लागला. १०० च्या आसपास असलेल्या लोकांनी मिळून केलेल्या या प्रयत्नांतून बिबट्याची या पाण्याच्या भांड्यातून अखेर सुटका करण्यात आली.
या बिबट्याची पुढील उपचारांसाठी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी करण्यात आली. सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वैद्यकीय यंत्रणेखाली बिबट्याची काळजी घेतली जात असल्याची माहिती सहायक वन संरक्षक तुळशीराम हिरवे यांनी दिली. या बिबट्याला मंगळवारपासून दोनदा सलाईनवर ठेवण्यात आले होते. रात्री पिण्यासाठी पाणी देण्यात आले. तेथील पशुवैद्यक पथकाच्या तपासणीत बिबट्याची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री उशिरा बिबट्याला खाद्य पुरवण्यात आले. लवकरच त्याला पूर्ण बरे वाटल्यानंतर पुन्हा बदलापूरनजीक जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
वेळोवेळी तपासणी
आता बिबट्याची प्रकृती ठीक असून, त्याला खाद्य पुरवण्यात आल्याचे सांगण्यात आले. भेदरलेल्या आणि थकलेल्या अवस्थेतील बिबट्याची बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय पथकाने वेळोवेळी तपासणी केली आहे, अशी माहिती सहायक वन संरक्षक तुळशीराम हिरवे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.