

Leopard Hunting Case
ESakal
मुंबई : मुंबईचे फुप्फुस मानल्या जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गाभा क्षेत्रात बिबट्यांची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डहाणू वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून बिबट्याच्या कातडीसह दोघांना ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान या शिकारीचे धागेदोरे थेट राष्ट्रीय उद्यानातील येऊर आणि चेना पश्चिम क्षेत्रापर्यंत पोहोचले. आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.