esakal | चंद्रनगरची स्वतंत्र ग्रामपंचायत करू : पालकमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

चंद्रनगरची स्वतंत्र ग्रामपंचायत करू : पालकमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डहाणू : सूर्या प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या चंद्रनगर गावाला महसुली गावाचा दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करून या भागाला रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.

डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद वणई गटाची पोटनिवडणूक प्रचारसभा दाभोण येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी भुसे बोलत होते. या वेळी भुसे यांनी शिवसेना उमेदवार रोहित गावित यांना निवडून देण्याचे आवाहन या वेळी केले. प्रचारसभेला खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, जिल्हाध्यक्ष राजेश शहा, महिला संघटक ज्योती मेहेर, केदार काळे, जयेंद्र दुबळा, सुशील चुरी, पिंटू गहला उपस्थित होते.

हेही वाचा: ED : शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीकडून समन्स

भुसे म्हणाले, खासदार राजेंद्र गावित यांनी गावागावात विकासकामे केली आहेत. त्यांचा हा वारसा त्यांचे पुत्र रोहित गावित हे चालविणार आहेत. आदिवासींच्या जमिनी बड्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. समान नागरी कायद्याच्या नावाखाली आदिवासींना आरक्षणापासून दूर ठेवण्याचा कट केला जात आहे. तो मतदारांनी हाणून पाडावा, असे आवाहन भुसे यांनी केले.

loading image
go to top