यंदा किती नगरसेवक येतात पाहू; पेडणेकरांचं भाजपला थेट आव्हान

मुंबईच्या नव्या प्रभाग रचनेवर बोलताना त्यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.
kishori pednekar
kishori pednekarsakal media

मुंबई महापालिकेत २०१७ मध्ये भाजपचे ८३ नगरसेवक निवडून आले होते पण आता किती येतात ते पाहू, असं थेट आव्हान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिलं आहे. नव्या प्रभाग रचनेनंतर झालेल्या बदलावरुन त्यांनी भाजपला हे आव्हान दिलं आहे. (Lets see how many Corporators will elected Kishori Pednekar challenge to BJP)

मुंबईच्या प्रभाग रचनेवर बोलताना पेडणेकर म्हणाल्या, २०१७ मध्ये तुम्ही संपूर्ण मुंबईची तोडफोड केली होती का? तुम्हाला कोर्टाने चपराक दिली आहे. निवडणूक आयोगाने ही प्रभाग रचना दिली आहे. तुम्ही जे यापूर्वी केलं तेच तुम्हाला आता सर्वत्र दिसतंय. मुंबईतील १९९ वॅार्डचे तीन तुकडे झाले आहे परंतू आम्ही आव्हान स्विकारलं आहे. सन २०१७ ला तुम्ही ८३ निवडून आलात आता बघुयात काय होतंय, असं थेट आव्हान पेडणेकर यांनी भाजपला दिलं.

जागतिक पाणथळ दिनानिमित्त वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या 'व्हर्चुअली वाईल्ड'या आभासी सफारीच्या तिसऱ्या भागाचे अनावरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाले त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मुंबई महापालिका ही एकमेव पालिका आहे जिनं बजेटमध्ये कांदळवनासाठी विशेष तरतूद केली आहे. मुंबईत साडे सतरा करोड रुपयांमध्ये मुंबईतील पेंग्विन पार्क उभारले तर गुजरातमध्ये २१७ कोटी त्यांच्या राज्य सरकारनं दिलं आहे. राणीबाग हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आजपासून बागा खुल्या झालेल्या आहेत. आमच्या राणीबागेत कुटुंबातील सदस्यांना कन्सेशन दिलं आहे, हे त्यांना परवडणारं आहे.

चित्रा वाघ काय माझ्या सासू आहेत?

पेडणेकर म्हणाल्या, चित्रा वाघ काय माझ्या सासूबाई आहेत, त्यांना विचारून मी कोठेही जावं. आम्ही शनिवारी गेलो हे कळताच यांना उलट्या सुरू झाल्या. भाजपनं त्यांना केवळ बडबड करण्यासाठी पक्षात घेतलं आहे. यावेळी त्यांनी अतुल भातखळकर यांच्यावरही टीका केली. भातखळकर यांनी तर सगळंच सोडलय, त्यांना केवळ उलट्या करण्यासाठी ठेवलंय अशा शब्दांत त्यांनी भातखळकर यांच्यावरही टीका केली. तसेच मुंबईची नक्कल गुजरात करतेय असं सागताना तुम्ही भ्रष्टाचार आरोप करताय तर पुरावा द्या, असं आव्हानही त्यांनी भाजप नेत्यांना दिलं. चिवाताई तुमचं गणित आणि इतिहास कच्चा आहे. इतिहास आणि गणित शिका नाहीतर पालिकेच्या शाळेत या आणि शिका. सध्या यासाठी ॲानलाईन शिक्षणाचाही पर्याय उपलब्ध आहे, पण अकलेचे तारे तोडू नका, असंही पेडणेकर चित्र वाघ यांच्यावर टीका करताना म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com