एसटी व्यवस्थापनाकडून मराठी भाषेची उपेक्षा! मुख्यालयातील ग्रंथालय बंदच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मुंबई : राज्यात मराठी राजभाषा दिन साजरा केला जात असताना गुरुवारी एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील ग्रंथालय बंदच होते. आठवड्यातून दोन दिवस हे ग्रंथालय उघडले जाते, असे सांगण्यात आले. यासंदर्भात एसटी अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. 

धक्कादायक! म्हणून त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल करून दिला ट्रिपल तलाक

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयातील पाचव्या मजल्यावर कर्मचाऱ्यांसाठी ग्रंथालयाची सोय करण्यात आली आहे. त्याची देखभाल-दुरुस्ती आणि व्यवस्थापनाची जबाबदारी कामगार विभागाकडे आहे. परंतु, काही वर्षांपासून हे ग्रंथालय सतत बंदच असल्याचे दिसून येते. या ग्रंथालयातील पुस्तके धूळ खात पडली आहेत. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजनाचे आदेश दिले असतांना, मराठी पुस्तकांच्या ग्रंथालयाकडेच एसटीच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

फक्त 'हे' कानातले घाला मग मुलींनो तुमची छेड काढण्यास कुणीही धजावणार नाही

कर्मचाऱ्यांना वाचनाची सवय व्हावी, शासकीय कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, याच उद्देशाने एसटीच्या कल्याण निधीतून या ग्रथांलयाची निर्मीती केली होती. मात्र, हा उद्देश धुळखात पडला आहे. यासंदर्भात एसटीचे मुख्य कल्याण अधिकारी सतिश उजैनकर यांना विचारणा केली असता. दोन दिवस ग्रंथालयाला उघडले जात असल्याचे सांगून त्यांनी त्यापेक्षा जास्त माहिती देण्यास नकार दिला. 
 
Library closed at ST Headquarters in mumbai

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Library always closed at ST Headquarters in mumbai