अपयश लपवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ! उरणमध्ये अधिकाऱ्यांनी चाचण्याच केल्या बंद

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 15 May 2020

उरण-करंजा येथील नवापाडा, सुरकीचा पाडा, कोंढरीपाडा व कासवले पाडा येथे 15 ते 20 दिवसांपासून कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगाने वाढला आहे. येथील बऱ्याच नागरिकांनी स्वखर्चातून कोरोना चाचणी केली; मात्र काही नागरिकांची चाचणी पैसेअभावी बंद केली होती. आता सरकारी खर्चातून त्या 60 जणांची चाचणी करण्यात आली आहे

उरण : उरण-करंजा येथील नवापाडा, सुरकीचा पाडा, कोंढरीपाडा व कासवले पाडा येथे 15 ते 20 दिवसांपासून कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगाने वाढला आहे. येथील बऱ्याच नागरिकांनी स्वखर्चातून कोरोना चाचणी केली; मात्र काही नागरिकांची चाचणी पैसेअभावी बंद केली होती. आता सरकारी खर्चातून त्या 60 जणांची चाचणी करण्यात आली आहे

नवी मुंबईची लवकरच रेडझोनमधून सुटका? बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

उरण परिसरात 5 मे रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर पुढील तीन टप्प्यात 138 जणांची झाली. त्यामध्ये तब्बल 96 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथील प्रशासनासह नागरिकांचे धाबे दणाणले. येथील या 138 रुग्णांनी स्वखर्चाने कोरोना चाचणी केली होती; मात्र काही गरीब आगरी, कोळी बांधवांकडे पैसे नसल्याने ते चाचणी करू शकले नाहीत. तर काही जण पैसे उधार घेऊन कोरोना चाचणी करण्यास तयार आहेत. मात्र, येथील आस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपले अपयश लपवण्यासाठी पाच दिवसांपासून कोरोना चाचणी बंद करून ठेवल्या होत्या; मात्र जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मार्तंड नाखवा यांनी थेट जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना येथील कोरोना चाचणी बंद केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी किंवा त्याची कानउघडणी करावी, अशा आशयाचे पत्र दिले होते. या पत्राच्या आधारे येथील 60 नागरिकांची कोरोना चाचणी सरकारी खर्चातून करण्यात आली आहे.

धक्कादायक! व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर करुन अवैध मद्य वाहतूकीचा प्रयत्न!

संशयित रुग्ण बिनधास्त फिरतात
सध्या कोरोनाची लक्षणे असलेले संशयित रुग्ण करंजा गाव आणि उरण शहरापर्यंत बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः याकडे गांभीर्याने लक्ष घालून  फिरणाऱ्यांवर निर्बंध घालावे आणि रुग्णांसाठी 
क्वारंटाईन सेंटरची व्यवस्था करून पुढील चाचणीही सरकारी खर्चातून करावी, असे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: life in denger to hide failure! In Uran, the authorities stopped testing