कोसेसरी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास; होडीतून पार करावी लागते धामणी नदी

सुर्या नदी प्रवास.jpeg
सुर्या नदी प्रवास.jpeg

कासा ः हडाणू तालुक्‍यातील सुर्या नदी किनारी कोसेसरी हे टुमदार गाव वसले आहे. मात्र ज्या सुर्य नदी काठी हे गाव वसले तेथून या नागरिकांना प्रवासाची कोणतीच साधने ेनाहीत. नदीवर पुल नसल्याने रोज जीवमुठीत घेवून लहानशा लाकडी होडीतून प्रवास करण्याची वेळ येथील नागरिक, गर्भवती महिला आणि लहान बालकांवर येत आहे. त्यामुळे नदीवर पुल उभारून नागरिकांच्या दळणवळणाची सोय करावी, अशी मागणी नागरिक सरकारकडे करत आहे. 


कोसेसरी भवाडी ग्रामपंचायत असून तिची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास असून येथील ग्रामस्थांना रोजगार, शिक्षण, गावातील मुलांना शाळेत पोहचण्यासाठी आणि गर्भविता महिलांना दवाखाण्यात जाण्यासाठी लाकडी होडी मध्ये जीव धोक्‍यात टाकून प्रवास करावा लागत आहे. ही सूर्यानदी ओलांडण्यासाठी लाकडी होडीचा वापर करून कोसेसरी ते सोलशेत असा 150 मीटर अंतर जीव मुठीत घेऊन पार करावे लागत आहे. 
सूर्या नदीमुळे डहाणू आणि विक्रमगड तालुक्‍याचा सीमा अधोरेखित केल्या आहेत   

कोसेसरी ग्रामस्थांना सूर्या नदीवर पार करून डहाणू - नाशिक राज्यमार्गांवर जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागत आहे. या नदीच्या वाहतुकीवर डहाणू तालुक्‍यातील एकूण 29 महसूल गावे व विक्रमगड तालुक्‍यातील महसूल गावे जोडली आहेत. सूर्यानदीवर पुलाअभावी मोठी गैरसोय होत आहे. सायवन, उधवा, दाभाडी, किन्हवली, तर सायवन कडून गंगोडी, शेणसरी मार्गे विक्रमगड हा जवळचा संपर्क पुलाअभावी तुटलेला आहे. परिणामी सायवन राज्यमार्गाने विक्रमगड, वाडा, जव्हार,मोखाडा, नाशिक येथे जाण्यासाठी कासा गावाला वळसा घालून 30 किलोमीटरचे अंतर पार करावे लागत आहे. सध्याच्या काळात दळणवळणाच्या बाबतीत सदर प्रवास खर्चिक व वेळकाढू ठरणारा आहे.  येथील अनेक ग्रामपंचायतींनी या पुलासाठी ठराव करून पाठवले आहेत, 

 

कोट... 
गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना येण्याजाण्यासाठी खूप मोठे कष्ट पडत आहेत. आम्ही प्रशासनाकडे बऱ्याच वर्षा पासून मागणी केली आहे येथे लवकरात लवकर पूल तयार करावाय. मी यासाठी सरकार दरबारी अनेक वेळा याचा पाठ पुरावा केला आहे. या मार्च पर्यंत पुलाच्या कामाला सुरुवात होईल या साठी प्रयत्न शील आहे. 
- शैलेश करमोडा, जि. परिषद सदस्य 

(संपादन ः रोशन मोरे)

life threatening journey in surya river Boat 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com