कल्याण-डोंबिवलीत कोविंड सेंटरवर दारु पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई 

party .jpg
party .jpg

कल्याण-डोंबिवलीत कोविड सेंटरवरील पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सेंटरवरील काही कर्मचारी मद्यपान करत असल्याचे या व्हिडीओत दिसते.  मुंबईसह कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोविड सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी दारु पार्टी आयोजित केली होती. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवली महापालिकेच्या सावळाराम स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये असलेल्या कोविंड सेंटरमधील हा व्हिडीओ आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने हे सेंटर चालवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला तात्काळ दारु पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यास सांगितले.

तिथून जाणाऱ्या एका वाटसरुन या पार्टीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. 

कोंविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जवळच तंबुची  उभारणी करण्यात आली आहे. कर्मचारी ड्युटीवर नसताना ही घटना घडली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७५ हजारच्या घरात पोहोचली आहे. रुग्णांची ही वाढती संख्या चिंतेचा विषय आहे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com